|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव आणि नानगाव या दोन गावांत नव्याने तब्बल 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
केडगाव येथे 13 तर नानगाव मध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्याच बरोबर राहू, वरवंड, खामगाव येथेही रुग्ण सापडत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा हा आकडा फक्त ग्रामिण रुग्णालयाचा असून खासगी रुग्णालयांमधील आकडेवारी मिळत नसल्याने आणि गर्दीची कटकट नको म्हणून अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात कोरोना टेस्ट करत असल्याने पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या जास्त असू शकते अशी शंका व्यक्त होत आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या हि वरील गावांच्या दृष्टीने चिंतेची बाब असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, साबणाने वारंवार हात धुणे तसेच सॅनिटायझर यांचा वापर कटाक्षाने करणे गरजेचे आहे.








