Corona Breaking – ‛दौंड’मध्ये एकाच कुटुंबातील 12 जणांना ‛कोरोना’ची लागण, खाजगी प्रयोगशाळेत केली होती तपासणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहर व  परिसरात कोरोनाचे १५ नवीन रुग्ण आढळून आल्याचे दौंड नगरपालिका प्रशासनाने सांगितले. दि.२५व २६ रोजी बाधित  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या १५ जणांनी आपली तपासणी खाजगी प्रयोग शाळेत केलेली होती. त्या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 

८पुरुष व ७ महिलांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील शालिमार चौक(१), पाटील चौक(२) तसेच लिंगाळी हद्दीतील सैनिक नगर परिसरातील एकाच कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. एकाच कुटुंबातील बारा जणांना संसर्ग झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

सैनिक नगर लिंगाळी हद्दीत येत असले तरी हा परिसर शहराला अगदी लागून असल्याने शहराला धोका वाढला आहे. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने शहरातील संशयितांची ची तपासणी झालेली नाही,आज सोमवार दि.२७ रोजी ७६ जणांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत त्यांचा अहवाल दि.२८रोजी प्राप्त होणार आहे.

दि.२७ जुलै पर्यंत २७२६ जणांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले त्यापैकी १८७ जणांचा अहवाल पॉझिटिव आला, त्यातील ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मितीला कोविड सेंटर मधील सक्रिय रुग्णांची संख्या ८५ असून २३ रुग्णांना घरी उपचार देण्यात येत आहेत. आज पर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची  माहिती दौंड नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.