मुंबई – सहकारनामा
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर येत आहे. स्वतः जयंत पाटील यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली असून त्यांनी ट्वीट करताना आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे म्हटले आहे.
नुकतीच त्यांची परि संवाद यात्रा झाली आहे. यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही खबरदारी म्हणून स्वतःची कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता सर्वांनी खबरदारीचे उपाय करणे गरजेचे बनले आहे. तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळणे इत्यादी उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरोग्य दूत विरुद्ध सिजनेबल टिका करणारे भूत
भीमा पाटस कारखान्याची सत्य परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. ‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’…
दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…
‘वो’ आंग पे ओढके लेताय यानी ‘कुछ तो गडबड है’ बाबा..! बोललं एकाला झोंबलं दुसऱ्याला…
दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती