Corona : दौंड ग्रामिणला मोठा दिलासा, 26 पैकी 26 निगेटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोना व्हायरस लपाछपी चा डाव खेळत आहे की काय असे वाटू लागले आहे. कारण एक दिवस अचानक कोरोनाचे पेशंट वाढून दौंडकरांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत तर दुसऱ्या दिवशी मात्र कोरोणाची संख्या शून्यावर येऊन दिलासादायक वातावरण तयार होत आहे.

आज अशीच दिलासादायक बातमी समोर आली असून दौंड ग्रामीण मधून एकूण 26 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्या पैकी सर्व 26 जणांचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह प्राप्त झाले. याबाबतची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.

घेण्यात आलेले स्वॅब हे बहुतांश कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचे होते त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र हे सर्वजण निगेटिव्ह आल्याने आता सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे.