– सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्यातील शहरीभाग आणि परिसरात आज 90 रुग्ण सापडले असताना ग्रामिण भागातून एक पुन्हा धक्कादायक माहिती समोर येत असून दौंडच्या ग्रामिण भागामध्ये पुन्हा 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याने आज एकदिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 झाली आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली आहे.
दौंड ग्रामिणमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि त्यांची एकूण संख्या खाली दिलेली आहे.
दौंड शहर आणि परिसरामध्येही कोरोनाचा आलेख चढता असून आज त्याठिकाणी 90 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आज दि.5 एप्रिल रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयात 316 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 90 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.