– सहकारनामा
दौंड : दौंड तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. तालुक्यात विविध गावांत दररोज कुठे न कुठे कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.
दि.4 एप्रिल रोजी यवत ग्रामीण रुग्णालयात 96 जणांचे नमुने घेण्यात येऊन ते पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यांचा आज दि.6 एप्रिल रोजी अहवाल आला असून यामध्ये 32 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश असून 2 वर्षाच्या बालकाचाही यात समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले रुग्ण व त्यांची गावे पुढील प्रमाणे आहेत
यवत 9,
केडगाव 3,
डाळिंब 5,
अष्टापुर 1,
पिंपळगाव 1,
देलवडी 1,
जाऊजीबुवाची वाडी 3,
देऊळगाव गाडा 1,
नाथाचीवाडी 2,
खुटबाव 2,
राहू 2,
वासुंदे 2