Corona – केडगावला थोडासा दिलासा तर एकेरीवाडी, कासुर्डीत रुग्णांचा आकडा वाढला ! आज 12 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी जास्त प्रमाणात सापडतच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र कमी होताना दिसत नाही.

दिनांक 20/09/2020  रोजी यवत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने 59 लोकांचे स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 59 पैकी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एकेरवाडी -3, कासुर्डी -3, बोरिऐंदी -2, केडगाव – 1, बोरी भडक – 1, राहू -1, उंडावडी-1 , असे एकूण 7 गावांतील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वय 15 वर्षे ते 61 वर्षे या दरम्यान असून यात 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.