दौंड : दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी केडगाव ता.दौंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर संविधान दिन कार्यक्रमात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य अधिकारी डॉ. निलिमा लोखंडे व उपकेंद्र बोरिपार्धी चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश भगत यांनी संविधान दिनाबाबत माहिती दिली.
यावेळी केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, श्री. गोपीनाथ हंडाळ, श्रीमती राणी कड, श्रीमती मोरे, श्रीमती प्रियांका गायकवाड, श्रीमती उज्वला वाघमोडे, जितेंद्र चव्हाण आदींनी संविधान दिनानिमीत्त आपापले मनोगत व्यक्त केले.