Categories: सामाजिक

दौंड मध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने कागदी आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : राष्ट्रीय हरित सेना (शेठ जोतिप्रसाद विद्यालय ,दौंड) यांचे वतीने विद्यार्थ्यासाठी पर्यावरणपूरक कागदी आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रिय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली.

आ. गुरुवर्य इंद्रजित देशमुख (काकाजी). संस्थापक, शिवम प्रतिष्ठान घारेवाडी जि.सातारा यांच्या सहयोगाने व काकाजींचे साधक सुहास प्रभावळे – विदयोदय शिक्षकमित्र (महाराष्ट्र राज्य) ज्ञान , कला, क्रीडा, संस्कार, कौशल्य केंद्र कराड यांच्या ” चला कल्पक बनुया “ या उपक्रमांतर्गत दिवाळी आकाश कंदिल बनविण्याच्या कार्यशाळे मध्ये भिमथडी शिक्षण संस्थेच्या शेठ जोतिप्रसाद विद्यालय, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय, श्रीमती गिताबाई मुकनदास बंब, इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा व श्रीमती गिताबाई मुकनदास बंब ,मराठी माध्यम प्राथमिक शाळांमधील 504 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आकर्षक पर्यावरणपूरक कागदी आकाश कंदील बनविले. या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने करण्यात आले होते.

आज विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षणाची गरज आहे म्हणून स्वतः बनवलेले पर्यावरण पूरक आकाश कंदील आपल्या सर्वांच्या जीवनात नक्कीच अंधारातून प्रकाशाकडे नेणारे ठरतील अशी भावना विद्यार्थ्यांचे मनात निर्माण झाली. याप्रसंगी संस्थेच्या सुमारे 504 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन सुंदर आकाश कंदील निर्माण केले.

याप्रसंगी भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, शे.जो. विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव लोणकर, श्रीमती गिताबाई मुकनदास बंब मराठी माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पानसरे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख प्रमोद काकडे, पर्यवेक्षक नवनाथ कदम, बाजीराव घोरपडे, संतोष सोनवणे, आनंद विनके सोमनाथ चव्हाण, शिंदे बी.बी. यांचेसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

17 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

18 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

19 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago