मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बिडमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता मुंबईच्या सांताक्रुज पोलीस ठाण्यात त्यांच्यावर तक्रार देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शिवराळ भाषेचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेले आरक्षण सरकारने दिले नाही म्हणून त्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारले होते. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे तसेच सगेसोयरे याचा आरक्षणात वापर करावा जेणेकरून अनेक मराठ्यांना याचा लाभ होईल अशी मागणी त्यांची होती.
राज्यसरकारने मराठा समाजाला अतिरिक्त दहा टक्के आरक्षण दिले ज्यामध्ये शाळा आणि नोकरी यासाठी हे उपयोगी असणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांना हे आरक्षण मान्य नसून मराठा समाजाला कुणबी हे सरसकट आरक्षण देण्यात यावे तसेच त्यामध्ये सगेसोयरे याचा समावेश करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.