Categories: राजकीय

आचारसंहितेची केली जातेय ऐशी की तैशी ! ‘प्रचार बंदी’ असतानाही सोशल मिडियावर जोमात प्रचार

दौंड : दौंड तालुक्यातील 10 ग्रामपंचायत निवडणूक मतदान उद्या 5 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर संपूर्ण प्रचार बंद करावा असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. मात्र सध्या दौंड तालुक्यात हे आदेश पायदळी तुडवले जात असल्याचे समोर येत आहे.

काल 3 तारखेला सायंकाळी 5:30 नंतर संपूर्ण प्रचाराला बंदी असताना आज सकाळपासून व्हाट्सअप, फेसबुक आणि विविध सोशल मिडिया अ‍ॅपवर उमेदवारांचा प्रचार जोमात केला जात आहे. निवडणूक प्रचाराला बंदी असतानाही हे प्रकार सर्रास सुरु असून विविध उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आचार संहितेची ऐशी की तैशी केली जात आहे. त्यामुळे आता आचार संहिता अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यावर काही कारवाई करणार का ? की सोशल मिडीयावर प्रचार करण्यास मुभा ठेवण्यात आली आहे ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

निवडणुकीवेळी विविध प्रतिबंध लावले जातात. आचार संहिता नियमावली दिली जाते मात्र त्याचे पालन कुणीच करताना दिसत नाही आणि अधिकारीही मूग गिळून गप्प बसतात. त्यामुळे या निवडणूकांना आचार संहिता आहे की नाही, आणि असेल तर आचार संहिता मोडणाऱ्यांवर काय कारवाई केली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago