सहकारी संस्थांना ‘वैधानिक लेखापरीक्षण’ Audit Report अहवाल सादर करण्याचे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी २०२१-२२ या वर्षाचे लेखापरीक्षण (Audit) करुन वैधानिक लेखापरीक्षण अहवाल (Audit Report) उप किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व सहकारी संस्थांनी त्यांचे ३१ मार्च २०२२ अखेरचे वैधानिक लेखापरीक्षण ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर पूर्ण करणे महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० नुसार बंधनकारक होते. तसेच सदर वैधानिक लेखापरीक्षण अहवाल ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत संबंधित उप किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयास सादर करणे बंधनकारक होते.

विहित कालमर्यादेत वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार वैधानिक व दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे यांनी दिली आहे.