Categories: Previos News

दौंड तालुक्यात गवतापासून CNG गॅस ची होणार निर्मिती, प्रकल्पासाठी आजी-माजी आमदारांकडून शुभेच्छा



दौंड : सहकरनामा

दौंड तालुक्यात हत्ती गवतापासून CNG गॅस तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यासाठी काही युवक आणि जेष्ठ मंडळींनी पुढाकार घेतला आहे.

याबाबत दौंडचे जेष्ठ नेते पोपटभाई ताकवणे यांनी माहिती दिली असून CNG प्रकल्पाविषयी बोलताना त्यांनी हा प्रकल्प दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा असून पर्यावरणाला व प्रदुषण मुक्तीसाठी त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. हा गॅस प्रकल्प नेपीयर (हत्ती गवत) पासून तयार करण्यात येत असल्याने याच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळून दर दोन महिन्याला याची  रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. 

हे गवत कमी खर्चात येते व उस पीका बरोबरीने रक्कम मिळते. दौंड तालुक्यात CNG प्रकल्प उभा राहिल्याने तरुणांना नोकरीचा फायदा व प्रत्येक गावात उद्योजका मार्फत रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

डिझेल, पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत, तेलासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागते. त्याला पर्याय म्हणून दौंड तालुक्यात सुरू होणारा हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. 

याबाबत संबंधित युवकांनी दौंडचे आजी, माजी आमदार राहुल कुल तसेच काल PDCC बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचीही त्यांच्या खुटबाव येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन रमेश थोरात यांनी या युवकांना आणि जेष्ठ मार्गदर्शक पोपटभाई ताकवणे यांना दिले आहे. 

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी व इतरांनी या प्रकल्पात सभासद व्हावे असे आवाहन पोपटभाई ताकवणे यांनी केले आहे.

माजी आमदार रमेश थोरात यांची भेट घेताना कंपनीचे एम.डी गिरामकर, पोपटभाई ताकवणे, उत्तमराव ताकवले, मंगेश रायकर, दत्तुआण्णा ताकवणे, अमोल नातु, निखिल थोरात, स्वप्निल खांदवे व सोपानराव यांसह इतर सहकारी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

15 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

17 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

18 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago