मुंबई :
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यानिमित्त आयोजित सभेत ल भाजपवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना हिंदुत्व धोक्यात म्हणणारे हिंदूंची आणि हिंदुत्वाची शिडी करून वरपर्यंत सत्तेत गेले मात्र आता सत्ता राखण्यासाठी ते ब्रिटिशांची निती आत्मसात करायला, ती वापरायला कमी करणार नाहीत. पण तुम्ही लोक त्यांचा हा डाव साध्य होऊ देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करतानाच, सर्वांनी एकजूट दाखवा आणि मराठी अमराठी हा भेद न करता हिंदुत्व वाढवा असे आवाहन आज दसरा मेळाव्यात केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाची शिडी करून जे वर गेले आहेत ते इंग्रजांची नीतीने काम करून तोडा, फोडा आणि राज्य करा, हा हेतू आत्मासात करू शकतात असा घणाघात करत आमचे हिंदुत्व हे देशपातळीवरील आहे. आम्हाला देश अगोदर आहे पण तुमचे साधले जात नाही म्हणून तुम्ही ज्यांच्या जीवावर मोठे झाला त्या शिवसैनिकांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणत आहात पण वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर नामर्दपणा आहे, अशी तोफही ठाकरे यांनी भाजपवर डागली.
‛आर्यन खान आणि ड्रग्स प्रकारणावरही उद्धव ठाकरेंनी डागली तोफ’
NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेलिब्रिटींवर होत असलेल्या कारवाईवरून एखादा सेलिब्रिटी पकडायचा, त्यावर तांडव करायचे, फोटो काढायचे हे नेमकं काय चाललं आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत ज्या बोटीवर केंद्रीय यंत्रणेने दहा ग्रॅम अमली पदार्थ शोधून काढले. चिमुटभर ड्रग्ज पकडून कितीतरी गाजावाजा केला. नंतर आज जामीन मिळणार की उद्या मिळणार, याच बातम्या सतत चालवल्या, हे सगळं सुरू असताना आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी दीडशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आणि त्याचा कुठेही डंका पिटला नाही.
मात्र गुजरातच्या मुंद्रा बंदरावर जे हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले आहे त्याचे काय? त्याचा तपास करायला न्यायालयाने सांगितले मात्र त्यावर कोणीही बोलायला तयार नाही आणि इकडे मात्र महाराष्ट्राला बदनाम करण्याची मोहीम हाती घेतली आहे. एखाद्याकडे ड्रग्ज मिळालं म्हणून त्याला तुम्ही थेट गुन्हेगार ठरवणार का? तरुण पिढीच्या भवितव्याचा विचार करणार की नाही. त्याला सुधारण्याची संधी, त्यासाठी पोषक वातावरण तुम्ही तयार करणार आहात की नाही. नवी पिढी घडवण्याची तुमची आणि आमची सर्वांचीच जबाबदारी आहे. ही पिढी बिघडली, नशेच्या विळख्यात गेली तर तेच उद्या तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवतील, असा इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. जस अमलीपदार्थांचं व्यसन जसं घातक, तसंच सत्तेचं व्यसनही घातक आहे त्यामुळे काहींना आज ते व्यसन जडलं आहे आणि खालपासून वरपर्यंत आपलीच सत्ता असावी आणि त्यामाध्यमातून आपल्या विरोधात जाणाऱ्यांची कुटुंबं उद्ध्वस्त करायची, ही त्यांची नीती असल्याचा निशाणा उद्धव ठाकरे यांनी शेवटी विरोधकांवर साधला.