Categories: राजकीय

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ… जेथे सर्वांनी स्विकारले तेथे माझ्याच लोकांनी नाकारले यावर विश्वास बसत नाही, आजच वर्षा बंगला सोडतो, पण… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साद

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय (political) उलथापालथीमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह ( facebook live) वरून शिवसैनिक (shivsena) आणि शिवसेना आमदार (shivsena mla) यांना भावनिक साद घातली आहे.

शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना जर तुम्हाला मी खरंच मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर फक्त एकदा समोर येऊन सांगा मी त्याचवेळी मुख्यमंत्री पद सोडतो आणि वर्षा बंगला सोडून थेट मातोश्रीवर जातो असे आवाहन केले आहे. पुढे बोलताना त्यांनी, माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे त्यामुळे थेट समोर येऊन बोलता येईना म्हणून फेसबुक लाईव्ह वरून बोलतोय, बोलण्यासराख बरच आहे. जसे कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात जशी परिस्थिती होती तिला तोंड देत मला जे करायचे होते ते प्रमाणिकपणे केले त्यामुळे देशातील पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आलो.

सोशल मिडीयात अनेक अफवा पसरविल्या गेल्या जसे की मी भेटत नव्हतो मात्र हे काहि दिवस का शक्य नव्हते कारण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे पहिली कॅबिनेट रूग्णालयात गेली. मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही, म्हणूनच आदित्य अयोध्येला गेला होता आणि मी हिंदुत्वावर बोलणारा पहिला मुख्यमंत्री होतो, मध्ये ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्यात आली होती. पण 2014 साली एकट्याच्या ताकदीवर शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले ते पण हिंदुत्वावर.

अचानक आमदार गायब झाल्यानंतर काही आमदारांचे फोन आले. तेथे लघु शंकेला गेला तरी शंका घेतली जाते. मी इच्छेपेक्षा जिद्दीने कार्य पूर्ण करणारा आहे.. कुठलाही अनुभव नव्हता मात्र तरी नाईलाजाने 2019 ला वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे अन्यथा पुढे सरकार चालणार नाही कारण सर्वच पक्षात जेष्ठ आणि अनुभवी नेते होते मात्र तरी पवारांचा, सोनियाजींचा आग्रह होता म्हणून जिद्द केली यात स्वार्थ नव्हता आणि वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. यावेळी प्रशासनाची खूप मदत झाली

आज काँग्रेसचे कमलनाथ, शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावरून मातोश्रीला मुक्काम हलवतो पण हे समोर येऊन बोला.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ… ज्या पद्धतीने स्वतःच्या लोकांकडून माझ्यावर घाव घातले जाताहेत त्याच्या वेदना अधिक आहेत. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे का? शिवसैनिक जोवर सोबत आहेत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे कारण मी संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. मी पद सोडतो पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तरच माझी तयारी असेल.

एकदा ठरवू या, समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो असेही शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago