मुंबई : राजकारणात जसे वरून सर्व सोप्पे दिसते तसे आतमध्ये नसते याची प्रचिती राज्यातील जनतेला आज दिवसभरात दुसऱ्यांदा आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सर्वांना वाटत होते मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, शिवाय आपण मंत्रिमंडळात नसणार तर बाहेरून मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते मात्र या कहाणीत पुन्हा एकदा ट्वीस्ट आला आणि एकनाथ शिंदे यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांकडून त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश आला होता त्यामुळे त्यांची इच्छा नसताना त्यांनी अखेर मंत्रिमंडळात यावे लागले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.