मुंबई : जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. यावेळी नितीन देशमुख यांनी आता मी पडळकरांना मारणार असे आव्हान दिल्याचेही एका वृत्तवाहिनीने आपल्या बातमीत दावा केला आहे. आज आव्हाड, पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन, विधिमंडळ लॉबीमध्ये मोठा राडा झालेला बघायला मिळाला आहे.
काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधान भवनाच्या परिसरातच बाचाबाची झाली होती. गाडीच्या दाराला धक्का लागल्याच्या कारणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये यांनी अश्लील शिवीगाळ देखील झाली होती.
हा राडा शांत झाल्यानंतर आता आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली दिसून आली. यामुळे विधानभवनात चांगलाच गोंधळ उडालेला बघायला मिळाला. या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.