Categories: क्राईम

बारामती मेडिकल कॉलेजमधील एम.बी.बी.एस (MBBS) चे विद्यार्थी आणि स्थानिक युवकांमध्ये तुंबळ हाणामारी, आरोपी-फिर्यादी अ‍ॅडमिट

पुणे : बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि स्थानिक युवकांमध्ये वाद होऊन या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले आहे. या हाणामारीत दोन्ही बाजूचे युवक गंभीर जखमी होऊन रुग्णालयात अ‍ॅडमिट झाले आहेत.

बारामती मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी अब्दुल मुकीम खान (सध्या रा. बारामती मेडिकल कॉलेज, मूळ रा. घाटकोपर मुंबई) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो आणि त्याचे मित्र सुनील शंकर सिंह महतो, शफिक मोहम्मद रफीक, उस्ता शशिकांत राधेश्याम चौरासिया, यातिक सतीश तवर असे मिळून बारामती मेडिकल कॉलेज येथील होस्टेलच्या पाठीमागील तळ्याजवळ सायंकाळी ०५:३० वा तेथील चहाच्या स्टॉलवर जात असताना आरोपी जयशंकर जयसिंग गरड (रा. बारामती, मूळ फलटण) आणि त्याचे इतर अनोळखी मित्र त्यांच्या जवळ आले आणि फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ दमदाटी करू लागले. फिर्यादीने याचा जाब विचारला असता त्यातील एकाने तेथील दगड हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात व कानामागील बाजूस मारून जखम केली. यावेळी आरोपी सोबत आणखीन चार ते पाचजण आले आणि या सर्व विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. यातील जखमिंना रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. बारामती पोलिसांनी यातील आरोपी जयशंकर गरड याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

परस्पर विरोधी फिर्याद दाखल – याबाबत वरील घटनेतील आरोपी जयशंकर गरड याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो व त्याचा मित्र ओंकार आणि त्याचे चार मित्र बारामती मेडिकल कॉलेजच्या पाठीमागील तलावाशेजारी बसले होते. त्यावेळी तेथे काही मुले बसली होती त्यापैकी त्यातील काही मुलांची भांडणे चालू होती. त्यामुळे मी तेथे त्यांना काय झाले असे विचारण्यासाठी गेलो व मी त्यांना विचारपूस करत असताना त्यातील एका मुलाने माझे गालात चापट मारले तसा मी खाली पडलो. त्यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या अनोळखी चार मुलांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यातील एकाने त्याच्या बूटाने माझे डाव्या डोळ्याजवळ तसेच डाव्या हाताच्या खांद्यावर व इतर मुलांनी त्याचे पायातील बुटानी पाठीवर जोरात मारहाण केली. यानंतर मला तेथील कोणीतरी इसमाने औषध उपचार कामे अ‍ॅडमिट केले असे फिर्यादीने म्हटले आहे.

बारामती मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी आणि स्थानिक तरुणांमध्ये झालेल्या या तुंबळ हाणामारीमुळे पालकवर्गामध्ये कमालाची भीती पसरली असून हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago