निवडणूक आयोगातर्फे कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नसल्याचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून ५ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेवरून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ शकतात असा अंदाज लावला जात होता.

मात्र या अधिसूचनेत प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही असे निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे.