Categories: पुणे

दौंड नगरपालिकेच्या भोंगळ, नियोजन शून्य कारभाराविरोधात दौंडकर रस्त्यावर | नगरपालिकेच्या विरोधात सर्वपक्षीय निषेध आंदोलन

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरातील बाजारपेठ, मुख्य चौक तसेच झोपडपट्टी प्रभागातील गटारींची पावसाळा येण्याआधी साफसफाई न केल्याने, गटारीतील गाळ न काढल्याने शहरात झालेल्या तुफान पावसामुळे गटारी तुंबून शहरातील रस्ते नदी नाले बनले. झोपडपट्टी प्रभागात राहणाऱ्या लोकांच्या घरात घाण पाणी शिरले, नागरिकांना याच घाण पाण्यात उतरून नाले सफाई करावी लागली, या सर्व परिस्थितीला नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप करीत येथील व्यापारी संघटना तसेच विविध राजकीय पक्ष व दौंडकर यांच्यावतीने नगरपालिका प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

दौंड शहरातील किंगमेकर कोण?

माजी आमदार रमेश थोरात, मा. नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, सोहेल खान, राजेंद्र खटी, आनंद पळसे, सचिन कुलथे, आबा वाघमारे तसेच व्यापारी वर्ग व विविध पक्षांचे पदाधिकारी मा.नगरसेवक उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले. नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी निवेदन स्वीकारले व दौंडकारांच्या मागणीप्रमाणे सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कोण होणार दौंड चा आमदार

नगर पालिकेला देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा मनमानी कारभार व हलगर्जीपणामुळे शहरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे सदरचे आंदोलन करण्यात येत आहे. पाऊस सुरू होण्याआधी शहरातील गटारी मधील गाळ काढणे, साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना नगरपालिकेचे ठेकेदार, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग त्यांच्याकडे साहित्य व वाहने उपलब्ध नसल्याने काम करण्यात अडथळा येत आहे अशी सबब सांगून काम करण्यास असमर्थ आहोत असे दर्शवित आहेत.

डोनेशन शिवाय अ‍ॅडमिशन मिळत नसल्याने सुशिक्षित मुलींच्या आत्महत्या वाढल्या

याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना होत आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे परंतु नगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. नगरपालिकेच्या संबंधित ठेकेदारास, शहरातील कचरा उचलणे व शहरातील सर्व ड्रेनेज लाईन मधील गाळ काढणे या कामासाठी नगरपालिका दरमहा 33 लाख रुपयांचे बिल अदा करते. आरोग्य विभागाने या ठेकेदाराकडून पावसाळ्याआधी सर्व ड्रेनेज मधील गाळ काढण्याचे काम करून घेणे गरजेचे होते परंतु सदर काम पूर्ण न करताच ठेकेदारास बिले अदा केली जात आहेत.
शहरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबल्या आहेत परंतु नगरपालिकेकडे असणारी ड्रेनेज चोकअप काढणारी जेटिंग मशीनच नादुरुस्त आहे त्यामुळे तुंबलेल्या गटारी साफ करण्याचे काम रखडले आहे. ज्यामुळे गटारीचे तुंबलेले पाणी नागरिकांच्या घरात व व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरत आहे. म्हणून सदरची मशीन त्वरित दुरुस्त करून तुंबलेल्या गटारी साफ कराव्यात.

दौंड नगरपालिकेला शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी येऊन काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा कामांचे वर्कऑर्डर देणे आवश्यक असताना ते दिले जात नाही. त्यामुळे सदरची कामे प्रलंबित आहेत. शहरातील अनेक विकास कामे सुरू करण्यात आलेली नाहीत त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नव्याने विकसित झालेल्या सरपंच वस्ती, गोपाळवाडी रोड परिसरातील रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत, पाण्याचा निचरा होण्यासाठीची सोय नसल्याने रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचत आहे व नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे.

मा. मुख्याधिकारी ह्या कामावर रुजू झाल्यापासून पूर्णवेळ आपल्या कार्यालयात हजर राहत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी दौंड नगरपालिकेला पूर्णवेळ काम करणारा तसेच स्थानिक ठिकाणी वास्तव्यास असणारा मुख्याधिकारी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौकातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या गटारी तुंबून त्यातील घाण पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरते आहे व त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे अशी परिस्थिती झाली आहे व ती नाकारताही येत नाही. परंतु या परिस्थितीला फक्त नगरपालिका जबाबदार नसून काही व्यापारी वर्ग सुद्धा आहे. कारण जेव्हा शहरातील  रस्ते, गटारीचे काम सुरू करण्यात येत होते तेव्हा काही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला आवश्यक असे सहकार्य केलेले नाही. ज्यामुळे शहरातील रस्ते व गटारी अरुंद झाल्या आहेत.व त्याचा परिणाम आता सर्वांना भोगाव लागत आहे असे नगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago