दौंड : दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्याकडून करण्यात येत असलेली विकासकामे, आरोग्यविषयक मदत अण त्यांची कार्यपद्धती यावर प्रभावित होऊन विविध गावांतील शेकडो युवक, जेष्ठ अण राजकीय नेते मंडळी पक्षप्रवेश करत आहेत.
आ.कुल यांच्या कार्यावर प्रभावित होऊन काल बोरीपार्धीचे माजी सरपंच त्रिंबक आण्णा सोडनवर, ग्रामपंचायत सदस्य शेखर तात्या सोडनवर, अशोक अडसूळ, राजेंद्र भोसले, अनिल नेवसे, सौ मनिषाताई पप्पूशेठ बर्वे, सोसायटीचे माजी चेअरमन विजय टेंगले, पंढरीनाथ सोडनवर, संतोष सोडनवर, निलेश ताडगे व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. डॉ.रामदास रुपनवर यांनी यात विशेष सहकार्य केले.
यावेळी आमदार राहुल कुल आणि सौ. कांचनताई कुल यांनी या सर्वांचे स्वागत केले व भाजपा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.