Categories: राजकीय

‘त्या’ प्रकरणात ‘चित्रा वाघ’ अडचणीत | पंगा माझ्या सोबत आहे, राष्ट्रवादीचे ‘मेहबूब शेख’ यांचा इशारा

‘सहकारनामा’ न्यूज नेटवर्क

पुणे : चित्रा वाघ यांचा अर्ज उच्च न्यायालय औरंगाबद खंडपीठाने फेटाळळ्यानंतर या प्रकरणातील प्रमुख राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मेहबूब शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत, कायदा हातात घेऊन कायद्याच्या निर्णयाच्या अगोदरच स्वतःला शहाणे समजून निर्णयात्मक भूमिका घेऊन माझी बदनामी केली. चित्रा वाघ यांनी एखाद्याची बदनामी करताना हा विचार करायला पाहिजे होता की इतरांच्या बदनामीसाठी पण कायदा असतो.

माझी बदनामी केल्याने मी चित्रा वाघ यांच्या विरोधात 50 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, चित्रा वाघ यांनी हा अब्रू नुकसानीचा दावा योग्य नाही असा अर्ज दिवाणी न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे Revision application दाखल केले होते ते मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सुद्धा फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मेहबूब शेख यांची बदनामी करणं त्यांना जड जात असल्याचे सध्यातरी दिसत आहे. मेहबूब शेख यांच्यावतीने ॲड.गिरीष नाईक-थिगळे यांनी काम पाहिले आहे.

काय आहे प्रकरण.. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका मुलीने आत्याचाराचा आरोप केला होता. हा आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी या प्रकरणात लक्ष घालत मेहबूब शेख यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र या प्रकरणात त्या मुलीने घुमजाव करत चित्रा वाघ यांचे या प्रकरणात नाव घेतल्याने खळबळ माजली होती. त्या सर्व प्रकाराबाबत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात मानहानी चा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र ती आता फेटाळण्यात आली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

43 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago