मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
राज्यातील विविध मान्यवर मंडळींकडून रुपाली चाकणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना आता भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही रुपाली चाकणकर यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, अभिनंदन करताना याचे श्रेय भाजपला देत राज्य महिला आयोग पदाची जागा भरण्यासाठी 2 वर्षापासून बीजेपी ने दिलेल्या लढ्याला यश मिळालं असल्याचं सांगितलं आहे. आणि अखेर राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास मुहूर्त सापडला, अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते,
तसेचं इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांना राष्ट्रवादी महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते त्यावेळी रुपाली चाकणकर ह्या पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा होत्या. मात्र, चित्रा वाघ यांनी अचानक राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी ने रुपाली चाकणकर यांना थेट प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन टाकली. हे निभावताना रुपाली चाकणकर यांनी जो सय्यम आणि वेळ पडल्यास आक्रमकपणा दाखवला ते पाहून त्यांची या महत्त्वाच्या पदावर झालेली नियुक्ती हे त्यांच्या कार्याला दिलेला मान असल्याचे बोलले जात आहे.