पद्मावती शांतीसेवा फाउंडेशनच्या ‛फर्स्ट स्टेप प्रि इंग्लिश स्कूल’ मध्ये चिमुकल्यांचे ‘फर्स्ट स्टेप’ उत्साहात

सुधीर गोखले

सांगली : येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मावती फाउंडेशनच्या नव्याने उभ्या राहिलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण केलेल्या फर्स्ट स्टेप इंग्लिश स्कूलचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला. चिमुकल्यांच्या आयुष्यातील शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज सुरू झाली.

प्रसंगी सुरुवातीला पद्मावती फाउंडेशनच्या सौ अपर्णा विवेक शेटे यांनी लहान मुला मुलींना औक्षण करून स्वागत केले तर लहानपणापासूनच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत नुसतीच शाळा ही शिकवण्यासाठी नसून तर आमच्या या फ्री स्कूलच्या माध्यमातून शिकणारा प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी भविष्यामध्ये समाजामध्ये एक आदर्श नागरिक बनावा या उद्देशाने आम्ही ही शाळा उभी करत असल्याचे मनोगत ‛सहकारनामा’ शी बोलताना सौ.अपर्णा विवेक शेटे यांनी व्यक्त केले.

तर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आम्ही पद्मावती फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली असून गोरगरीब जनतेसाठी आमचा ट्रस्ट सदैव बांधील असून आजपर्यंत आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून कोविड काळामध्ये तसेच पूरग्रस्तांसाठी व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये आमच्या ट्रस्ट ने सदैव साथ दिली आहे असे प्रतिपादन पद्मावती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे यांनी केले.