छगन भुजबळ यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक : लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी माघार घेतली आहे. त्यांनी स्वत:च आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.

बारामती येथे घडले शाळकरी मुलाचे भिषण हत्याकांड, पहा घटनेचे व्हिडीओ आणि माहिती

याबाबत छगन भुजबळ यांनी माहिती देताना, आपण नाशिकच्या जागेची मागणी केली होती. यावेळी मी समीर भुजबळांच्या नावाचा आग्रह केला तर अमित शहा यांनी मात्र तुम्ही असाल तर ठीक राहील असे म्हटले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तसाच प्रस्ताव ठेवला होता. मी नाशिकची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी याबाबत केंद्रातून सूचना आल्या असे भुजबळ म्हणाले.

मात्र आपण आता या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर करत गृहमंत्री अमित शहा यांनी जो आपल्यावर विश्वास दाखवला, आपल्या माझ्या नावाची शिफारस केली त्याबाबत त्यांचे धन्यवाद मानले.

मराठा बांधवांनी सहकार्य केले त्यांचेही धन्यवाद… आपले नाव जाहीर झाल्यानंतर विविध समाजातील लोकांनी आपल्याला सपोर्ट केला. यात मराठा बांधवांनीही आपल्या नावाचे स्वागत केले. त्या सगळ्यांचे आपण आभार मानत असल्याचे तसेच नाशिकमधून माघार घेत असल्याची घोषणा छगन भुजबळांनी आज केली आहे.