पुणे : दौंड तसेच बारामती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत त्यांच्या शेतातील ऊस खरेदी करून त्याचे गाळप झाले तरी शेतकऱ्यांना त्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर आता कडक कारवाई सुरु झाली आहे. याबाबत ‘सहकारनामा’ ने वृत्त प्रसिद्ध करून या दलालांचे काळे कारनामे समोर आणले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी विनोद उर्फ पप्पू लक्ष्मण तावरे (रा. मोरगाव,ता.बारामती.जि.पुणे) व इम्रान उर्फ बाबू उस्मान सय्यद (रा.बोरिपारधी ता.दौंड.पुणे) यांनी मोरगांव (ता.बारामती जि.पुणे) या गावच्या हद्दीतील फिर्यादी बबन निवृत्ती तावरे यांच्या मालकीच्या जमीन गट नं.४४८ मधील ३० गुंठयामधील १ लाख ८ हजार रुपयांचा ४७ टन उस फिर्यादीचा विश्वास संपादन करून घेऊन गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपिंना ऊसाचे १,०८,०००/-रूपये वेळोवेळी मागीतले असता त्याने त्यांनी सदरचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. तसेच १) बापु ज्ञानदेव तावरे यांचा १० टन उस, २) युवराज श्रीरंग तावरे यांचा १९ टन उस, ३) नवनाथ बाळासो तावरे यांचा १० टन उस असा एकुण ९३ हजार ५०० रुपयांचा ३९ टन उस तोडुन नेवुन आजपर्यंत पैसे न देता सुमारे २,०१,५००/- रूपयांची फसवणुक केली असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपिंवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह मोहिते करीत आहेत.