चांद्रयान-3 गगनात झेपावलं, तब्बल 40 दिवसानंतर ‛या’ तारखेला चंद्रावर उतरणार

इस्रो चांद्रयान-3 अपडेट न्यूज

आज चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं आणि शास्त्रज्ञ तसेच देशवासीयांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. या चांद्रयान 3 चा प्रवास आता सुरू झाला असून चांद्रयानाच्या प्रक्षेपणासोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची तिसरी चंद्र मोहीमेला सुरूवात झाली आहे.

642-टन, 43.5-मीटर-उंच रॉकेट LVM3-M4 चांद्रयान-3 ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केले. चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चंद्र हस्तांतरण मार्गात समाविष्ट करण्यात आले. 30,00,00 किमी पेक्षा जास्त अंतर कापून ते पुढील 42 दिवसांत चंद्रावर पोहोचेल असा अंदाज आहे.
चांद्रयानाच्या प्रक्षेपणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ’14 जुलै 2023 हा दिवस भारतीय अवकाशाच्या क्षेत्रात नेहमी सुवर्ण अक्षरात कोरला जाईल आणि देशाच्या आशा आणि स्वप्नांना पुढे नेईल’.

चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासात नवा अध्याय लिहिला आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. त्यांच्या कष्टाला आणि प्रतिभेला मी सलाम करतो असेही मोदी म्हणाले.

चंद्रावर भारताची तिसरी मोहीम चांद्रयान-३, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात असून इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे 642 टन वजनाचे LVM-3 रॉकेट दुपारी 2.35 वाजता चांद्रयानासह निघाले. चांद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे 40 दिवस लागतील. प्रक्षेपणानंतर अवघ्या 16 मिनिटांनी, चंद्रयान-3 दुपारी 2.50 वाजता सुमारे 179 किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळे होईल. यानंतर चांद्रयान-3 चा सुमारे 3.84 लाख किमीचा चंद्र प्रवास सुरू होईल. अंतराळयानाने वाहून घेतलेले लँडर 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट-लँड करणे अपेक्षित आहे.