अख्तर काझी
दौंड : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पतंजली योग समिती तर्फे आज 21 जून रोजी सकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत योगाचा कार्यक्रम साजरा केला गेला. पतंजली योग समितीचे दौंड चे अध्यक्ष राजू गजधाने यांनी ध्यान प्राणायाम आणी योगाचे धडे दिले. योगा आणी प्राणायाम ने मानवी शरीराला होणारे फायदे आणी योगाचे महत्व सांगितले.
यावेळी मोठया प्रमाणात योग प्रेमी उपस्थित होते. योग्य मार्गदर्शन आणी सतत १९ वर्षांपासून शहरातील नागरिकांना योगाचे धडे दिल्या बद्दल राजू गजधाने यांचा नागरिकां कडून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बाळासाहेब साळुंके,वैभव टाटिया, वैभव महाराज कांबळे, भवर धुमावत,प्रताप भोसले, अशोक गायकवाड,शेखर गोलांडे यांच्या उपस्थिती सह मोठ्यासंख्येने योग्य प्रेमी उपस्थित होते. जागतिक योग दिनानिमित्त शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली त्यास योग प्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.