Categories: Previos News

दौंड बार असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेऊन ‘अ‍ॅडव्होकेट डे’ साजरा

दौंड : ‘अ‍ॅडव्होकेट डे’ च्या निमित्ताने दौंड बार असोसिएशनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद देत दौंड न्यायालयातील वकील वर्ग,न्यायिक कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी 41 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.

यावेळी न्यायाधीश गोयल – खेडकर साहेब, काळदाते साहेब, मुक्कनवार साहेब, मोर साहेब, कुलकर्णी साहेब यांनी यावेळी वकिलांना ‘अ‍ॅडव्होकेट डे’ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर्पण ब्लड सेंटर, विश्वराज हॉस्पिटल लोणीकाळभोर यांचे शिबिरास विशेष सहकार्य लाभले.

दौंड बार असोसीएशनच्या सदस्यांकडून केक कापून ‘अ‍ॅडव्होकेट डे’ साजरा करण्यात आला. यावेळी दौंड तालुका ‘अ‍ॅडव्होकेट’ बार असोसीएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव तसेच संपूर्ण कार्यकारिणी व सर्व वकीलवर्ग उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago