– सहकारनामा
मुंबई :
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘100 कोटींची वसुली’ प्रकरणात आज सीबीआय चौकशीला सुरुवात झाली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुलीचे गंभीर आरोप लावले होते.
या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबईत सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते आज अनिल देशमुख हे सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय चे दोन पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.यातील एका पथकाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक (एसपी) रँकचे सुमारे सहा सात सीबीआय अधिकारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लादलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करत आहेत. ते संबंधित लोकांचे स्टेटमेंटही घेणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून जर सीबीआयला अनिल देशमुख यांच्याविरूद्ध परमबीरसिंग यांच्या आरोपांशी संबंधित पुरावे सापडले तर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी महाराष्ट्रातील माजी गृहमंत्र्यांविरूद्ध एफआयआर दाखल करू शकते अशी माहिती समोर येत आहे.