दौंड मध्ये व्यापाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ, गुन्हा दाखल

दौंड : बेन्टेक्स दागिने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दौंड मध्ये घडली. या प्रकरणी रेवननाथ दत्तू सोनवणे (वय 27,रा. सोनवडी दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

दौंड पोलिसांनी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जनार्दन पहाणे (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 127(2), 351(2), 352 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3(1),(r), 3(1),(s), 3(2) (va) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 24 मे रोजी दुपारी 1:45 च्या सुमारास सोनवडी येथील फिर्यादी यांच्या घराजवळ घडली. आरोपीने फिर्यादी यांना फोनवरून जातीवाचक शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी दौंड पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रार नोंदवून फिर्यादी घरी जात असताना आरोपीने त्यांना दुचाकी आडवी मारली व पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करीत तू लय माजलाय का म्हणत धमकी दिली आहे, असे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे.