दौंड : दौंडच्या नदी पात्रामध्ये वाळू चोरी करून ही चोरीची वाळू ट्रक मधून घेऊन जात असताना दौंड पोलिसांनी एकाला पकडले आहे. यावेळी दौंड पोलिसांनी आरोपीकडून 10 लाख 20 हजरांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक 06/05/2025 रोजी पहाटे 04 च्या सुमारास लिंगाळी दौंड रोडवर आरोपी अमोल रामदास कानकाटे (वय 37 वर्षे रा. उरूळी कांचन ता. हवेली जि. पुणे) याच्याकडे गौण खनिज (वाळू) चे उत्खनन करण्याचा कोणताही परवाना नसताना वाळु चे बेकायदेशीरपणे उत्खनन करून ती चोरी करून त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक नं MH 12 HD 6766 या मध्ये लिंगाळी रोडने वाहतुक करीत जात असताना पोलिसांना मिळुन आला.
यावेळी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पंकज भरत देवकाते यांनी आरोपीला पकडत त्या विरुद्ध फिर्याद देत बी.एन.एस. 303(2) सह पर्यावरण अधिनियम 9, 15, गौण खनिज कायदा कलम 3 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून 10,000,00/- रूपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रक नं MH 12 HD 6766 आणि 20,000/- रूपये किंमतीची चार ब्रास वाळु जप्त केली आहे. घटनेचा अधिक तपासी पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करीत आहेत.