दौंडमध्ये कृषी सहाय्यकावर गुन्हा दाखल

दौंड : घरात येऊन पत्नीला बेदम मारहाण करून तिचा हात फ्रॅक्चर करणाऱ्या कृषी सहाय्यक आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या एका महिलेवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौ. गंगा उर्फ सोनल बाळासाहेब डमरे (रा. गोपाळवाडी, दौंड जि पुणे)
यांनी फिर्याद दिली आहे.

सौ.डमरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब तुकाराम डमरे (वय 49 वर्षे, नोकरी सहाय्यक पर्यवेक्षक, कृषी विभाग) आणि सुवर्णा बसप्पा टकक्लगी (वय-36 वर्षे,धंदा-गृहिणी पत्ता फलोत्पादन विभाग,कृषी भवन,साखर संकुल शेजारी,शिवाजीनगर ,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्हा दि.22/04/2022 ते दि.09/07/2024 तसेच 25 डिसेंबर 2024 व त्यानंतर आजपर्यंत रोजरोज घडत असल्याचे फिर्यादित म्हटले असून हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी आरोपी यांनी फिर्यादीच्या घरात येऊन दारू पिऊन फिर्यादीस बेदम मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या डावा हात मनगटात फॅक्चर केला. त्यामुळे जवळपास 60 दिवस फिर्यादीच्या हातास प्लॅस्टर लावले होते असे फिर्यादित म्हटले आहे.

तसेच पुढे फिर्यादीमध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील घटनेनंतर पुन्हा एके दिवशी आरोपी फिर्यादीच्या घरामध्ये चोरपावलांनी घुसले व फिर्यादीला जबर मारहाण केली.  फिर्यादीच्या मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या आईला अश्लिल शिवीगाळ करून फिर्यादीला अर्वाच्य भाषेत चारित्र्यहीन शिव्या व शब्द प्रयोग वापरून सर्वासमक्ष बदनाम केले.   

यावेळी आरोपी व सोबत असणारी सुवर्णा बसप्पा टक्कलगी यांनी फिर्यादीच्या घरातली रक्कम चोरून नेली असाही आरोपी फिर्यादित करण्यात आला आहे. वरील मजकुरावरुन एम केस BNSS 175(3) प्रमाणे आल्याने दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि नं 514/2025 भा.न्या.संहिता कलम 333, 323, 352, 351(2)/(3), 3(5), 118(1), 117(2), 115(2) प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.