‛राहू’ ची प्रतीक्षा पहिल्याच प्रयत्नात बनली ‛CA’, आमदार राहुल कुल यांच्याकडून विद्यार्थ्यांना ‛हा’ मोलाचा सल्ला



दौंड(राहू) : सहकारनामा (संदीप सोनवणे)

तरुणांनी मनात कुठलीही भीती आणि न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांना मोठ्या धैर्याने सामोरे जाण्याची आवश्यकता असून त्यांनी जर मनात आणले तर त्यांना यश हे हमखास मिळेल असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.

राहु (ता.दौंड) येथील प्रतीक्षा मारुती अडसूळ हिने जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळवले. तिच्या या यशाबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते. याप्रसंगी शिक्षण नेते विकास शेलार,अनिल नवले,मारुती अडसूळ,जिजा अडसुळ,गुरुदत्त शिर्के आदी उपस्थित होते.

प्रतीक्षा हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तसेच कैलास विद्या मंदिर राहु व त्यानंतर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय येथे झाले.

पुण्यातील बी एम सी सी कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिने लेखापरीक्षक स्पर्धेमध्ये यश मिळवले तिच्या यशाबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आवर्जून तिचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. आपल्या यशामागे आई जिजा वडील मारुती अडसुळ, भाऊ रवि यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिक्षा हिने सांगितले.