मुंबई : दौंडचे आमदार राहूल कुल यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला आता मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
आमदार राहुल कुल यांनी केलेल्या आवाहनाला त्यांचे कार्यकर्ते आणि चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ मध्ये तब्ब्ल 30 लाख रुपये देणगीचे धनादेश जमा केले आहेत. हे सर्व धनादेश आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
राज्यात अती मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला होता. या अतिवृष्टीची झळ विदर्भ, माराठवाडा सह राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसली होती. याच दरम्यान आमदार राहुल कुल यांचा वाढदिवस साजरा करण्याची लगबग कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली होती. आमदार कुल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत माझ्या वाढदिवसाला हार, नारळ, बुके आणि इतर पद्धतीने करण्यात येणार खर्च टाळून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन केले होते. आ.कुल यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळून सुमारे तीस लाख रुपये मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झाली आहे.






