‛भोसरी’ ते ‛शिवनेरी’ पायथापर्यंत बस सेवा सुरू करावी : आ.महेश लांडगे यांची मागणी

पुणे/जुन्नर : भोसरी ते जुन्नर (शिवनेरी पायथा) या मार्गावर नवीन बस सेवा सुरु करण्याची मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना केली आहे. त्यांचे याबाबतचे निवेदन पत्र कुंदन काळे यांनी पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांना देण्यात आले आहे.
आ.महेश लांडगे यांनी आपल्या या निवेदनामध्ये पुणे जिल्हात स्वराज्याचे प्रतिक असलेले किल्ले शिवनेरी येथे आपल्या
शहरातून अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात जात असतात. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक हे मंचर, जुन्नर व आंबेगाव या ठिकाणी नोकरी निमित्त ये-जा करीत असतात. तर प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थ्यांची संख्याहि येथे मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर खाजगी वाहनातून प्रवास करणे महिलांना व विद्यार्थ्यांना जोखमीचे असून प्रवास करते वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या आपल्या विभागामार्फत मंचर पर्यंतच बससेवा उपलब्ध असून प्रवाशांना पुढील प्रवास करताना इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
भोसरी हे ठिकाणाहून अनेक प्रवासी जुन्नर याठिकाणी जाण्यास उभे असतात. त्यामुळे किल्ले शिवनेरी पायथ्यापर्यंत लवकरात लवकर यामार्गावर तात्काळ बससेवा सुरु करावी आणि राजगुरुनगर ते मंचर या मार्गावर सर्व ठिकाणी बस थांब्यावर बसस्टॉप बसविण्यात यावे अशी मागणी यात करण्यात आली आहे.