बारामती : बारामती तालुक्यातील आंबी येथे भरदिवसा एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून दागिने आणि रोख रक्कम लुटून नेण्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रंजना भाऊसाहेब जगताप (रा.आंबी बु. ता. बारामती) या घरामध्ये असताना घरासमोर दोन अज्ञात इसम मोटार सायकलवर आले आणि त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी यांनी त्या दोन इसमांना घराचा दरवाजा उघडुन पाणी दिले मात्र त्यावेळी त्या दोन्ही इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी घराकडे जावुन
दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या दोन इसमांनी घराचा दरवाजा जोरात ढकलुन आत प्रवेश केला आणि त्यातील एकाने फिर्यादीला चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या
अंगावरील सोन्याचे दागीने तसेच कपाटामधील रोख रक्कम बळजबरीने चोरून घेवुन गेले.
चोरट्यांनी वृद्धेच्या अंगावरील 50 हजारांचे सोन्याचे मनी व दोन
सोन्याचे डोर्ले, काळे मन्याचे पोतीमध्ये
वोवलेले एक तोळा वजमाने मनी
मंगळसूत्र, 50 हजारांचे दोन सोन्याची कर्ण फुले व त्याला वेल असलेले एक तोळा वजनाचे रक्कमेची दागिने, तसेच 20 हजारांची चार ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, 13 हजार रोख रक्कम आणि 500 रु. किमतीचा मोबाईल असा 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई शेख करीत आहेत.
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक