दौंड : सहकारनामा
भीमा सहकारी साखर कारखाना लि., मधुकरनगर-पाटस, ता. दौंड, जि.पुणे या कारखान्याची सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक ३०/०३/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजता मिटींग हॉलमध्ये ऑनलाईन पध्दतीने कारखान्याचे अध्यक्ष आमदार अॅड. राहुल सुभाषराव कुल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सभासदांना पोस्टाने ऑनलाईन (OAVM) सभेकरीता आवश्यक असणारी लिंक आणि क्युआर कोड सभेच्या नोटीशीबरोबर पाठविलेली आहे. सर्व सभासदांना शेती विभाग कर्मचा-यांमार्फत सभेच्या अहवालाचे घरपोच वाटप केले आहे.
तसेच सर्व सभासदांनी https://webcastlive.co.in/BSSK38thAGM/
या लिंक द्वारे सभेस सहभागी व्हावे अशी माहिती कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री.आबासाहेब निबे यांनी दिली.