|सहकारनामा|
मुंबई : राज्यातील निर्बंध हटविण्यात (BreakTheChain) आलेले नाहीत असे स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले असून नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन
असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल असे स्पष्ट करताना (BreakTheChain) अंतर्गत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.
राज्यात टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार होणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय होणार आहे – राज्य शासनाचे स्पष्टीकरण