Breaking : जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन



नवी दिल्ली : वृत्तसेवा

काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज दि.25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:30 ला निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी स्वत: याबाबत  ट्विट करून माहिती दिली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना अगोदर मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र नंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले गेले होते.

त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करुन दिली.