Categories: Previos News

Breaking : मुंबईतील पत्रकारांना हिणवणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकाराला मुंबईकर पत्रकारांनी चोपले



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

पत्रकारितेचे सर्व संकेत आणि मुल्य पायदळी तुडवत एका पत्रकाराने इतर पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने  वाद निर्माण होऊन त्या पत्रकारास इतर पत्रकारांनी चांगलेच चोपले आहे.

याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार 

एन.सी.बी.च्या कार्यालयासमोर बातम्या देताना रिपब्लिक चॅनेलचे रिपोर्टर कायम आरडा ओरडा करून कव्हरेज करत असतात असा आरोप इतर पत्रकरांकडून होत असतो. त्यामुळे इतर वृत्तवाहिणींच्या पत्रकारांना Live बातम्या  कव्हर करताना वेळोवेळी अडचणी येत असतात. 

मात्र आज बातम्यांचे  कव्हरेज सुरू असताना रिपब्लिक वहिनीच्या रिपोर्टरने मुंबईतील पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार असे संबोधून त्यांना हिनवले त्यामुळे मुंबईकर पत्रकारांचा संताप अनावर झाला आणि दिल्लीहून आलेल्या रिपब्लिक वाहिनीच्या आरडा ओरडा करणाऱ्या  पत्रकाराची त्यांनी चांगलीच धुलाई केली.

हि धुलाई सुरू असताना मुंबई पोलिसांनी मध्यस्ती करून वाद मिटवला.

सुशांत सिंह प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट पुढे येत असल्याने अनेक पत्रकार एनसीबी च्या कार्यालयाबाहेर जमत असतात आणि तेथून लाईव्ह रिपोर्टिंग करत असतात मात्र  गुरूवारी सकाळी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराने इतर सर्व माध्यमांच्या पत्रकारांना चाय-बिस्किटवाले गरिब पत्रकार म्हणून संबोधल्याने इतर पत्रकारांचा संताप अनावर झाला. यानंतर या सर्व  पत्रकारांनी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला जाब विचारला असता यावेळी धक्काबुक्की झाली आणि वाद होऊन रिपब्लिकच्या पत्रकाराला चोप बसला.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago