Categories: Previos News

Breaking News – ‛सहकारनामा’च्या बातमीचा जबरदस्त दणका.. गुऱ्हाळांवर कोरोना काळात वापरलेले मास्क, हँडग्लोज घेऊन जाणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला, तिघांवर गुन्हा दाखल



|सहकारनामा|

दौंड : कोरोना काळात वापरलेले पीपीई किट, मास्क, ग्लोज हे दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर जाळण्यासाठी आणले जाते आणि ते वापरले जात असल्याची धक्कादायक बाब सर्वप्रथम ‛सहकारनामा’ ने बातमीतून उघड केली होती. 



यानंतर यवत पोलिसांनी गुऱ्हाळांवर ‛वॉच’ ठेऊन आज गुऱ्हाळांवर वरील प्रमाणे घातक कचरा जाळण्यासाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला मालासह जेरबंद करत गुऱ्हाळ चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

यवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १६/०६/२०२१ रोजी भाउसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन यांना गोपणीय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, एक निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर नं.एम.एच.४२.एफ.१२१७ त्याचे सोबत जोडलेल्या दोन ट्रॉली मधुन हॉस्पीटलचे वेस्टेज साहित्य घेवुन पोलीस स्टेशन हददीतील गु-हाळास इंधन म्हणुन जाळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

अशी बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी

लगेच सपोनि/ वाबळे, सपोनि/लोखंडे, पो.ना./१४१८ बनसोडे, पो.ना./२०१८ शिंदे, पो.कॉ./२४०५ गायकवाड व पो.कॉ./२४७९ होळकर यांना बोलावून त्यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर वरील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सरकारी वाहनाने सदर ट्रॅक्टरचा शोध घेण्यासाठी गेले असता खामगांव ते नांदुर रोडच्या कडेला असणा-या गु-हाळा समोर सदर संशयीत ट्रॅक्टर नं.एम.एच.४२.एफ. १२१७ त्यामध्ये हॉस्पीटल मधील वेस्टेज साहित्य असल्याचे दिसुन आले. 

त्यानंतर सदर वाहनाची जवळ जावुन खात्री केली असता त्यामध्ये हॉस्पीटल मधील वापर झालेले मास्क, ग्लोव्हज, डायपर व गोळयांचे प्लॅस्टीक कव्हर व इतर बायोमेडीकल वेस्टेज साहित्य असल्याचे दिसुन आले. त्याबाबत भादंविक २७०, राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना २०२० चे कलम ११, साथ रोग प्रतिबंधक कायदा १८५७ मधील खंड २,३,४, पर्यावरण कायदा कलम १५ प्रमाणे गु-हाळ चालक

१) मोहंमद अहकाम गुलजार (वय – २३ वर्षे रा. सालियर साल्हापुर जिल्हा हरिव्दार राज्य उत्तराखंड) २) ज्ञानेश्वर

एकनाथ सांगळे (वय – २६ वर्षे, रा.कोकटवाडी ता.शेवगाव जि.अहमदनगर) ३) आकम मुशरफ व बायोमेडीकल वेस्टेज

पुरविणारे इसम यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्याचे पैकी गु-हाळ चालक १) मोहंमद अहकाम

गुलजार २) ज्ञानेश्वर एकनाथ सांगळे यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास

सहा.पोलीस निरीक्षक के.वाय.वाबळे हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सो, डॉ.अभिनव देशमुख (भा.पो.से.), मा.अपर पोलीस अधीक्षक सो, बारामती श्री.मिलींद मोहिते, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो, श्री.राहुल धस यांचे मार्गदर्शाना खाली

पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील, सपोनि/ वाबळे, सपोनि/ लोखंडे, पो.ना./१४१८ बनसोडे, पो.ना./२०१८

शिंदे, पो.कॉ./२४०५ गायकवाड व पो.कॉ./२४७९ होळकर यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

24 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago