दौंड : दौंडतालुक्यातील खुटबाव जवळ असणाऱ्या साळोबा वस्ती येथे कार चालकाने रस्त्याने पाई चालत जाणाऱ्या तीन इसमांना जोरदार धडक देऊन चिरडल्याने यात दोन इसमांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत आकाश ज्ञानदेव खंकाळ (वय 35 वर्षे व्यवसाय – खा.नोकरी रा.खुटबाव साळोबावस्ती ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी आरोपी आकाश अनिल जगताप (रा.यवत ता.दौंड जि.पुणे) याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 06/01/2023 रोजी सायं.7ः30 वाजण्याच्या सुमारास खुटबाव (ता.दौंड, पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या साळोबावस्ती येथील पिराजी अंबादास शेंबडे यांच्या जनावरांचे गोठया जवळ यवत ते खुटबाव जाणा-या डांबरी रोडवर कार नं.एम.एच.12/यु.यु/2999 वरील चालक आकाश अनिल जगताप या आरोपीने त्याची कार ही बेदरकारपणे, भरधाव वेगाने चालवित आपण एखादयाच्या मृत्युला कारणीभुत होवु शकतो हे माहीत असताना सुध्दा जाणीवपुर्वक त्याचे ताब्यातील कार बेदरकारपणे भरधाव वेगाने खुटबाव बाजुकडुन यवत बाजुकडे चालवित घेवुन जात फिर्यादी यांचे वडील ज्ञानदेव लाला खंकाळ व ओळखीचे ज्ञानदेव गुलाब शेळके यांना पाठीमागुन जोरात धडक देवुन ज्ञानदेव लाला खंकाळ (वय 64 वर्षे) व ज्ञानदेव गुलाब शेळके (वय 40 वर्षे दोंन्ही रा.खुटबाव साळोबावस्ती ता.दौंड जि.पुणे) यांच्या गंभीर दुखापतीस व मृत्युस कारणीभुत ठरला.
या दोघांना त्याने गाडीने चिरडल्यानंतर काही वेळाने बाळु सखाराम शिंदे (रा.खुटबाव साळोबावस्ती ता.दौंड जि.पुणे) यालाही कारची धडक देवुन भरधाव वेगाने गाडी चालवुन त्याला ही जखमी केले. आरोपीने या जखमींना कोणत्याही प्रकारची मदत न करता भरधाव वेगाने तसाच पुढे निघुन गेला. फिर्यादी आकाश खंकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश अनिल जगताप याच्या विरूध्द यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक लोखंडे हे करीत आहेत.