दौंड (अब्बास शेख) : काल रात्री यवत ता. दौंड येथील मुळीक वस्तीवर तीन अज्ञात इसमांनी शशिकांत पांडुरंग चव्हाण यांच्या घरावर हल्ला करून त्यांचा मुलगा विश्वजित चव्हाण याचा खून केला केला होता तर शशिकांत चव्हाण, उज्वला शशिकांत चव्हाण आणि प्राची वैभव यादव यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. याबाबत विश्वजित चव्हाण याची पत्नी सारिका चव्हाण हिने फिर्याद दिली होती.
यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे गतीने फिरवत यातील आरोपी निष्पन्न केले आहेत.
पोलिसांनी आरोपी १) सलमान दिलशाद शेख (वय – २८ वर्षे रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद जवळ, बडौत ता. जि. बागपथ राज्य – उत्तर प्रदेश) २) मोमीन अकबरशेख.(वय-४५ रा.पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद, जवळ बडौत ता. जि. बागपथ राज्य- उत्तर प्रदेश) अशी असल्याची सांगितले असून त्यांनी त्यांचे साथीदार नामे ३) रावतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर (वय – २६ धंदा- रा. बडौत जि. बागपथ राज्य – उत्तर प्रदेश) ४) गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान (वय-२५ धंदा-गुराळ कामगार रा. काशीराम कॉलनी बडौद ता. जि. बागपथ राज्य- उत्तर प्रदेश) यांचे मदतीने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच यातील इतर दोन आरोपी रावतसिंग चौधरी व गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान हे घटनास्थळाचे परिसरातत्यांची पडलेली बॅग शोधायला गेले असल्याचे सांगितल्याने त्यांना शोधण्यासाठी यवत पोस्टे चे पथक व स्थानिक गुन्हे शाखेची पथके खानाकरून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
वरील आरोपिंना यवत पोलिसांनी अटक केली असून चोरीच्या उद्देशाने घरात घुसून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सदर आरोपी हे परप्रांतीय असल्याची माहिती मिळत आहे. तर काही आरोपी हे गुऱ्हाळावर काम करत असल्याचे आता उघड झाले आहे.
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, राहुल गावडे, दत्ताजी गावडे, कुलदीप संकपाळ, प्रवीण सपांगे, सुवर्ण गोसावी, अभिजात सावंत, अमित सिद पाटील, किशोर वागज, सलीम शेख, ईश्वर जाधव, हनुमत पासलकर,बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरांदे, रामदास बाबर, विजय कांचन ,अभिजित एकशीगे, राहुल पवार, राहुल गुंभे, मंगेश थीगले, योगेश नागरगोजे.रणजित कोंडके, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, सागर नामदास,तुषार भोईटे, मंगेश भगत, निलेश शिंदे,अजय घुले,बिबीशन सस्तुरे, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महें्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव,दत्तात्रय काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ,विशाल जावळे,प्रमोद गायकवाड, मारुती बाराते, प्रणव नानावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.