Breaking News | बारामतीमध्ये ‘राईस पुलिंग’ ! 200 कोटीच्या अमिषाने इंदापूरच्या शेतकऱ्याची 1 कोटी 13 लाखांची फसवणूक, कासे चे भांडे आणि 200 कोटींचे गौड बंगाल..

क्राईम न्यूज : अब्बास शेख

बारामतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कासेच्या भांड्याच्या माध्यमातून 200 कोटी रुपये मिळण्याच्या आशेने एका युवकाची सुमारे 1 कोटी 13 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार साऊथ च्या राईस पुलिंग या चित्रपटासारखा असून या प्रकारांना राईस पूलिंग असेही म्हटले जाते.

या प्रकारात फसवणूक झालेले शेतकरी राजेंद्र बाबुराव शेलार (रा. संसर ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1) रफिक इस्माईल तांबोळी (रा. लोहगाव, पुणे) 2) शिराज शेख-पानसरे (रा. कोंढवा, पुणे) 3) उमेश उमापुरे (रा.कासार शिरसी, ता.निलंगा, लातूर) 4) धनाजी पाटील (रा. सांगली) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपिंनी फिर्यादीस 200 ते 250 वर्षाच्या जुन्या कासेच्या भांड्याच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून बारामती शहरातील बँकेतून 1 कोटी 13 लाख रुपये घेतले. मात्र त्या कासेच्या भांड्याच्या माध्यमातून 200 कोटी रुपये काही त्यांना मिळाले नाही तसेच फिर्यादी यांनी आरोपिंना दिलेले 1 कोटी 13 लाख रुपयेही मिळाले नाही त्यामुळे फिर्यादी यांनी वरील चार आरोपिंवर बारामती पोलीस स्टेशमध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राईस पुलिंग पोलिंग सारख्या जादू टोण्याच्या प्रकाराचा संशय… फिर्यादी यांना कासे च्या भांड्याच्या माध्यमातून (विक्रीतून) 200 कोटी रुपये कसे मिळू शकतात आणि हे भांडे 200 कोटी रुपयांना कोण आणि का विकत घेईल याबाबत तर्क वितर्क लावले जात असून हा संपूर्ण प्रकार राईस पुलिंग ह्या चित्रपटासारखा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचा अधिक तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.