Breaking News |मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

शिरूर : शिरूरमधून वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीकडून माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.

यामुळे उमेदवारी रद्द..

मंगलदास बांदल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांनी पक्षाचा प्रोटोकॉल पाळला नाही असा ठपका ठेवून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.