दौंड : दौंड तालुक्यातील यवतजवळ असणाऱ्या कासुर्डी फाट्यावर काळ्याबाजारातील रेशनिंगचा तांदूळ, गहू आणि हरभरा असा मुद्देमाल विकायला निघालेले 4 आरोपि आणि 3 टेम्पो पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला यश आले आहे. शासनाचा हा सर्व माल केडगाव येथील एका व्यापाऱ्याला विकण्यात येणार होता अशी माहिती समोर येत असून ‘तो व्यापारी कोण’ याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून केडगाव या ठिकाणी काळ्या बाजारात रेशनींगचा माल विकला जात असल्याची माहिती Lcb ला मिळाली होती. यानंतर Lcb च्या टिमने कासुर्डी टोलनाक्याजवळ सापळा लावत पुण्याकडून येणाऱ्या संशईत वाहनांची तपासणी केली. त्यावेळी संशईत 3 टेम्पोमध्ये Lcb टीमला 217 गोणी तांदूळ, 6 गोणी गहू आणि एक गोणी चना असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी यातील चार इसमांकडे अधिक चौकशी केली असता हा सर्व माल केडगाव येथील एका व्यापाऱ्याला विकला जात असल्याची माहीती समोर आली आहे. त्यामुळे रेशनींगचा काळ्याबाजारातील माल घेणारा केडगावचा ‘तो’ व्यापारी कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.
Lcb टिमने मोठ्या शिताफिने हा सर्व माल पकडला असून शासनाचा चोरीचा माल विकणारे आणि विकत घेणारे अश्या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात येतील अशी आशा व्यक्त होत आहे.
संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे काम यवत पोलीस ठाण्यात सुरु असून सविस्तर वृत्त थोड्याच वेळात देत आहोत…