Breaking News – जनावरांची चोरी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखा (LCB ) कडून जेरबंद! 9 जणांवर गुन्हा दाखल, 11 लाखांच्या मुद्देमालासह 6 गुन्हे उघड, सर्व आरोपी केडगाव, चौफुला, लोणीभापकर परिसरातील



| सहकारनामा |

पुणे : दिनांक ०३/०५/२०२१ रोजी  स्थानिक गुन्हे शाखा LCB पथक कोरोना लॉकडाऊन चे अनुषंगाने पुणे सोलापुर हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना  यवत पोलिस स्टेशन हद्दीतील बोरी पारधी येथील शेळ्यांची चोरी करणारे काही जण चौफुला सुपा रोडवरील कॅनॉलवर असल्याची माहिती त्याांना मिळाली.

त्याप्रमाणे सदर ठिकाणी LCB ने सापळा लावून दोन जणांना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्यांनी १) भरत शिवाजी जाधव (वय २७ वर्ष रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड जि. पुणे) २) अमोल शिरशु माने (वय २२ वर्ष रा.लोणी भापकर ता.बारामती जि. पुणे) असे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली त्यांनी १) महादेव तानाजी जाधव २)हनुमंत रमेश जाधव ३) अनिल अशोक माने ४)अंकुश शिवाजी जाधव ५) राहुल जालिंदर माने सर्व (रा.केडगाव टोलनाका ता.दौंड जि पुणे) ६) रामदास माने रा.मुरटी ता.बारामती जि. पुणे ७) अविनाश संजय ठोंबरे (रा.लोणी भापकर ता.बारामती जि. पुणे) यांच्या मदतीने खालील गुन्हे केले असल्याचे कबुल केले आहे. 

१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१२६/२०२१ भा.द.वि ३७९

२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२२६/२०२१ भा.द.वि ३७९

३)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२४६/२०२१ भा.द.वि ३७९

४) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.२३/२०१८भा.द.वि ३७९

५)सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.११८/२०२१ भा.द.वि ३७९,३४

६)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६४/२०२१ भा.द.वि ३७९.

यातील आरोपी १) भरत शिवाजी जाधव (वय २७ वर्ष रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड जि. पुणे) २) अमोल शिरशु माने (वय २२ वर्ष रा.लोणी भापकर ता.बारामती जि.पुणे) याच्या ताब्यातून वर नमूद गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 बोलेरो पिकअप  १)MH-42-M-8328 २) MH-42-0368 व एक बिगर नंबर काळया रंगाची ऍक्टिव्ह असा एकूण ११,००,०००/- (अकरा लाख) रु किमतीचा मुद्देमाल जप्त करणात आला आहे. 

सदरची कामगिरी ही मा.डॉ. अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण , मा.श्री मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट  यांचे मार्गदर्शनाखाली पोसई शिवाजी ननवरे, अमोल गोरे, पो हवा अनिल काळे, रविराज कोकरे, हनुमंत पासलकर, पो ना विजय कांचन, पो कॉ अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धीरज, जाधव, अक्षय जावळे, दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे.