Categories: पुणे

Breaking News : दौंडचे माजी नगराध्यक्ष ‘बादशहा शेख’ यांना राजस्थान मधून ‘अटक’! ‘LCB’ ची मोठी कारवाई

पुणे : दौंडचे माजी नगराध्यक्ष ‘बादशहा शेख’ यांना राजस्थान मधून ‘अटक’ करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (Lcb) कडून करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन कुटुंबामध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात मा. नगराध्यक्ष बादशाह शेख यांसह जवळपास 20 जणांविरोधात ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा ,विनयभंग करणे आदि कलमान्वये दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बादशहा शेख यांनी बारामती, जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. प्रकरणाच्या सुनावणीनंतर दि.23 नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयाने बादशाह शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

यानंतर बादशहा शेख यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. बादशहा शेख यांना अटक करण्यासाठी भाजप नेते नितेश राणे यांनीही दौंडमध्ये आंदोलन केले होते. बादशहा शेख यांना राजस्थान च्या अजमेर जवळून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत असून याबाबत दौंड पोलिसांकडून मात्र अजून कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही.

बादशहा शेख यांना अटक करण्याची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, बारामती विभागीय पोलीस उपअधीक्षक भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे व पोलीस हवालदार सचिन घाडगे यांच्या पथकाने केली असल्याची माहिती मिळत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

7 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

9 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

11 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago