जालना : आज दुपारी 2:15 वाजता मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार काय म्हणतंय हे नागरिकांसमोर जाहीर केले. ज्यामध्ये सरकारला एक महिना वेळ द्यावा, न्यायालयात टिकेल असे आरक्षण देऊ, जरांगे यांनी उपोषण सोडावे असे सुचवले असल्याचे सांगितले. तर याबाबत काय निर्णय घ्यावा याबाबत चर्चा केली. यावेळी सर्वानुमते सरकारला एक महिना वेळ द्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज जरांगे पाटील उपोषण सोडणार अशी आशा निर्माण झाली आहे. खालील पाच अटी पूर्ण होताच उपोषण सोडले जाणार आहे.
उपोषण सोडण्यासाठी या आहेत पाच अटी –
पाच मागण्या केल्या 1) मराठ्यांना 31 व्या दिवशी आरक्षणाचे पत्र वाटप करायची
2) महाराष्ट्रात जेवढे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात यावे व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
4) उपोषण सोडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ यावे व छत्रपती उदयन राजे भोसले, संभाजी राजे भोसले यांनी यावे.
5) सरकारच्या वतीने हे सर्व तुम्ही आम्हाला लिहून द्यायचे (टाईम बॉण्ड लिहून द्यायचा) अश्या पाच अटी टाकण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी चर्चा करत सरकारला वेळ द्यायचा की GR हातात घ्यायचा असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आणि समजा उद्या घाई गरबडीत सरकारने GR काढला आणि तो निर्णय जर न्यायालयात टिकला नाही तर मग काय करायचे असा सवाल त्यांनी नागरिकांसमोर उपस्थित करून आपण द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले. आणि 40 वर्षे आपण वेळ दिला पण आता एक महिना सरकारला वेळ देऊ आणि तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहिलं आणि 31 व्या दिवशी मराठ्यांच्या हातात मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल असे त्यांनी आज जाहीर केले.
मनोज जरांगे यांचा आज उपोषणाचा 15 वा दिवस आहे. राज्य सरकारने काल रात्री सर्वपक्षीय बैठक घेत मराठा आरक्षणावर चर्चा केली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे ठरले तसेच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.